दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
|
देगलूर ते बोधन धावणारी लालपरी एका महिन्यात दोन वेळा फेल.
देगलूर:राज्य परिवहन महामंडळाची देगलूर आगाराची देगलूर ते बोधन तेलंगणा राज्यात धावणारी लालपरी बस ही तेलंगणा राज्यातील बोधन येथे जावून परत येत असताना आदमपूर ते खतगाव रस्त्यावर नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले.
देगलूर आगाराची बस क्रमांक एम. एच. २० बि.एल. १९२७ ही १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता तेलंगणा राज्यातील बोधन बसस्थानकातून काही प्रवासी घेवून सगरोळी, खतगाव, आदमपूर मार्गे देगलूर येथे जात होती. ती खतगाव ते आदमपूर रस्त्यावर सकाळी ११:३० वाजता आल्यानंतर नादुरुस्त होऊन बंद पडली आहे. त्यामुळे बसमधील २० ते २२ प्रवाशांना पुढे देगलूर जाण्यासाठी दुसरी गाडी वेळेवर मिळाली नसल्याने बराच वेळ त्या ठिकाणी प्रवाशांना ताटकळत बसावे लागले आहे. या अगोदरही गेल्या महिण्यात १४ ऑगस्ट २०२२ रोजी देगलूरहून बोधनकडे जाणारी बस क्रमांक एम.एच. २० बि.एल. २२२१ ही लालपरी बस देगलूरहून बोधनकडे जात असतांना अशाच पध्दतीने नादुरुस्त होऊन आदमपूर फाट्यावर बंद पडली होती. त्यावेळी
देखील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढे बोधन जाण्यासाठी वेळवर वाहन मिळाले नसल्याने तेंव्हा देखील प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले होते. त्यामुळे देगलूर आगार प्रमुखाने देगलूर-बोधन आंतरराज्य धावणारी लालपरी बसेस या नादुरुस्त व भंगार अवस्थेतील पाठवत असल्याने प्रवास करणारे प्रवाशी हे देगलूर आगार प्रमुखावर नाराजी व्यक्त करीत आहेत. देगलूर आगाराच्या कांही भंगार व नादुरुस्त असलेल्या लालपरी बसने प्रवास करणे प्रवाशांना वरच्यावर त्रास दायक ठरत असल्याचे प्रवाशातून बोलले जात आहे. त्यामुळे देगलूर आगार प्रमुखाने देगलूर ते बोधन धावणारी लालपरी बसेस या दुरुस्त असलेल्या व चांगल्या दर्जेदार असलेल्या लालपरी बसेस देगलूर ते बोधनसाठी प्रवासी सेवेत रस्त्यावर काढाव्यात नादुरुस्त व भंगार लालपरी बसेस रस्त्यावर काढून प्रवाशांना त्रास देऊ नये, अशी प्रवाशांतुन मागणी होत आहे.
