दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्विनी बाळासाहेब सातपुते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर या जिल्ह्यांमधील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह राजकीय सामाजिक धार्मिक पत्रकार अशा विविध क्षेत्रांतून पोलीस अधीक्षक सातपुते मॅडम यांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा व्यक्त केल्या. लेडीज सिंघम आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची पोलीस प्रशासन विभागांमध्ये चांगलीच ओळख आहे. तेजस्विनी सातपुते या २०१२ मधील भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्या मुळच्या अहमदनगर जिल्ह्यांतील पाथर्डी हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी आत्तापर्यंत पुणे शहर वाहतूक शाखेच्या प्रमुख उपआयुक्त पदाची जबाबदारी मोठ्या कौशल्यांने हाताळली होती. यावेळी त्यांनी पुणे शहरांमध्ये वाहनधारकांना हेल्मेट सक्ती चांगलीच केली होती. अपघात नियंत्रणासाठी या त्यांच्या निर्णयाला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसादही दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यगृह विभागांने सातारा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यांचे अवघ्या सात महिन्यांतच बदली झालेले पोलीस अधीक्षक डॉ.पंकज देशमुख यांच्याकडूंन त्यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हाती घेतली होती.पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच कोरोनांचे संकट येऊन उभे राहिले होते. मात्र पोलीस अधीक्षक सातपुते मॅडम यांनी सातारा जिल्ह्यामधील कोरोनाचा चांगलाच मुकाबला केला होता.ही त्यांची कामगिरी अजूनही सातारकरांच्या आठवणीत आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये त्यांनी मोका अंतर्गत तसे अनेक मोठमोठे गुन्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आले.आणि सातारा जिल्ह्यांमध्ये त्यांनी अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. तसेच त्यांना सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये काम करताना जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले त्यामुळे त्यांची कामगिरीही सातारकरांच्या अजूनही आठवणीत आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये काम करीत असताना पुन्हा त्यांची राज्य गृह विभागांने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती केली.आणि सातारा पोलीस अधीक्षक म्हणून अजयकुमार बन्संल हे रुजू झाले. बदलांच्या आदेश प्राप्त होताच पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यांचा पदभार नव्यांने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्याकडे सोपवून त्यांनी सातारकरांचा निरोप घेतला. सातारच्या बदलीनंतर त्यांनी लगेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडूंन त्यांनी पदभार स्वीकारला. सध्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्विनी सातपुते मॅडम सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा कार्यभार पाहत आहेत. त्यांच्या आज अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त राज्यस्तरीय पत्रकार श्री. संभाजी पुरीगोसावी यांनी दूरध्वनीच्या माध्यमांतून पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम आणि पुरीगोसावी यांचा पुणे शहरापासून चांगलाच परिचय होता. पुणे शहर च्या बदलीनंतर सातारा जिल्हा पोलीस दलात पदभार घेण्याअगोदर श्री. पुरीगोसावी यांनी त्यांचे सोशल मीडिया वरुन आणि साताऱ्यांत रुजू होतात समक्ष स्वागत बुके व सातारी कंदी पेढे देवुन सातपुते मॅडम यांचे स्वागत करणारे जिल्ह्यांतील प्रथमच आणि पहिलेच पत्रकार श्री.पुरीगोसावी यांनी त्यांचे स्वागत केले होते.
