दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यातील पार पडलेल्या मौजे नरंगल व खुतमापुर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मौजे नरंगल येथील सोसायटीवर काँग्रेस बहुमताने विजयी तर खुतमापुर येथील सोसायटीवर भाजपचा १३ पैकी १३ जागांवर उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवून सेवा सोसायटीवर काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांनी झेंडा फडकवला आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही भाजपचे वाढते वर्चस्व पाहायला शक्यता वर्तविण्यात येत आहे
तालुक्यातील मौजे खुतमापूर व मौजे नरंगल येथील सेवा सहकारी सोसायटीचे निवडणूक नुकतीच पारपडली. सदरची निवडणूक भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि कॉंग्रेसचे आ. जितेश अंतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खुतमापुरचे भाजपचे समर्थक बाबु पाटील आणि नरंगलचे काँग्रेस समर्थक ताराकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक पार पडली, त्यात मौजे नरंगल येथे भाजप पुरस्कृत इरवंतराव पाटील त्यांचे पॅनल आणि काँग्रेसचे आहे. ताराकांत पाटील यांच्या पॅनलमध्ये अटीतटीचा सामना होवून अखेर कॉंग्रेस पुरस्कृत ताराकांत पाटील यांच्या पॅनलच्या ११ उमेदवार विजयी झाले तर इरवंतराव पाटील गटाला २ उमेदवाराच्या विजयावर समाधान मानावे लागले. मिळण्याची
तर मौजे खुतमापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणूक मिळत आहे. अटीतटीची होणार असा अंदाज व्यक्त होत असताना मतमोजणीची निकाल हाती आल्यानंतर बालाजी इंगळे यांच्या बळीराजा विकास पॅनलचा दारूण पराभव करत भाजपचे समर्थक बाबु पाटील यांच्या पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार विजय मिळवून बालाजी इंगळे यांच्या बळीराजा विकास पॅनलचा सुफडा साफ करून आपली ताकद दाखवून दिली
सदरच्या निवडणुकीतून आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याची तयारी भाजपा करीत असल्याने आगामी निवडणुकीत सर्व पक्षाची प्रतिष्ठापणाला लागणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांतून ऐकायास मिळत आहे.
