दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यात खाजगी प्रयोग शाळा चा सुळसुळाट झाला असून प्रयोगशाळा (लॅबोरेटरी) धारकाकडे अधिकृत PMC (Paramedical Council maharashtra) नसणाऱ्या प्रयोगशाळा धारकांना योग्य ती कारवाई करवी. असे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय ,मुख्याधिकारी साहेब,वैद्यकीय अधिकारी साहेब यांना सविस्तर सांगून परवाना नसलेल्या प्रयोगशाळा धारकाकडून चुकीच्या चाचण्या होत आहेत याचा परिणाम देगलूर तालुक्यातील रुग्णांना होत आहे तरी प्रयोगशाळा (लॅबोरेटरी) यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले.यावेळी दिगंबर कौरवार,संतोष आगलावे ,विकास मोरे,राहुल पेंडकर ,शुभम मठपती,विनायक नागशेट्टीवार आदींच्या उपस्थितीत देण्यात आले .
