दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक गणेश रमाकांत देशपांडे यांनी तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने असलेल्या बिअर बार व परमिट रूमच्या लायसन्ससाठी स्थळ पाहणी व चारित्र्य दाखला व निरंक अहवाल डी. वाय. एस. पी. उस्मानाबाद यांना पाठविण्यासाठी स्वतः साठी व साहेबांसाठी म्हणून रक्कम रु. २५,०००/- लाच मागत असल्याची तक्रार उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस नाईक देशपांडे यांनी तक्रारदाराकडे रक्कम रुपये २५,०००/- लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीच्याविरुद्ध भूम पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर प्रकरणात आरोपीच्यावतीने ॲड. निलेश जोशी सोलापूर यांनी अटकपूर्व जामीनसाठी भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यात आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तिवाद मान्य व ग्राह्य धरून भूम येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्हि. एस. माने सो यांनी आरोपी गणेश देशपांडे पोलीस नाईक यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात आरोपी पोलीस नाईक गणेश देशपांडे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी सोलापूर, ॲड. मोगल यांनी काम पाहिले.
