दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- देशाच्या सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात अभियोक्ता ऍड.प्रशांत भूषण यांचे भारतीय लोकशाही वरील आव्हाने या विषयावर २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा मराठा मंडळ सभागृह,रामदासपेठ,अकोला येथे स्पष्ट व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.देशोन्नतीचे मुख्य संपादक डॉ.प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात टी.व्ही.मीडियाचे वरिष्ठ पत्रकार आशुतोष पाठक प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सदस्य ऍड.बी.के.गांधी,अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.सी.एन.वानखेडे,माजी सरकारी वकील ऍड.सुभाष काटे,मायबोली साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.अनंत खेळकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास आपण प्रामुख्याने उपस्थित राहावे.अशी विनंती देशोन्नती चे मुख्य संपादक मा.श्री.डॉ.प्रकाश पोहरे यांनी केली असून त्यांनी मा.ऍड.प्रशांत भूषण हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत.भ्रष्टाचाराविरुद्ध,विशेषत: न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनासाठी ते ओळखले जातात.भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत अण्णा हजारे यांच्या टीमचे ते प्रमुख सहकारी आहेत.त्यांनी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यासमवेत सरकारशी झालेल्या चर्चेत नागरी समाजाची बाजू घेतली होती.२जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सुब्रमण्यम स्वामी आणि सर्वोच्च न्यायालय आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन (CPIL) च्या वतीने अधिवक्ता प्रशांत भूषण.त्यांच्या १५ वर्षांच्या वकिलीत त्यांनी ५०० हून अधिक जनहित याचिकांवर जनतेच्या वतीने लढा दिला आहे.ऍड.प्रशांत भूषण हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत निष्पक्ष आणि निष्पक्ष आहेत.पारदर्शक व्यवस्थेचा पुरस्कार करताना,देशाची कायदेशीर रचना भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक असावी,असे त्यांचे मत आहे.
