दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
अण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी खुर्द येथे लोणीकंद पोलिस स्टेशन आणि अण्णासाहेब मगर विद्यामंदिर मांजरी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था मार्गदर्शन संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तपास पथकाचे प्रमुख स.पो.नि.गजानन जाधव साहेब यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना सुरक्षितता बाबतीत आज मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गुन्हे शोध पथक (क्राइम ब्रॅंच) लोणीकंद पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी बाळासाहेब सकाटे यांनी सायबर क्राईम म्हणजे काय? सायबर क्राईमबाबत काय माहिती असली पाहिजे. आपला इ-मेल सुरक्षित ठेवणे, अकाैंट हॅक झाल्यास काय करावे? ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काय काळजी घ्यावी. तंत्रज्ञानाचे फायदे अगणित आहे पण तोटेदेखील आहेत. आपल्या हातून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना चुका होऊ नयेत .
मुलांनी घरून शाळेत निघाल्यावर अनोळखी व्यक्तींच्या गाडीवर बसू नये किंवा काही खायला दिले तर आपण ते खाऊ नये.जर येता जाता मुलींची छेड कोण काढत असेल तर आपण याकडे दुर्लक्ष न करता विद्यालयातील शिक्षकांना किंवा पोलिस स्टेशन शी संपर्क साधावा अशा वेळी पोलिस आपल्या रक्षणासाठी अवघ्या १० मिनीटांमध्ये हजर रहातील.जर समाजामध्ये कोणी अफवा पसरवत असेल आपण त्या अफवांवर विश्वास न ठेवता त्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा याविषयी माहिती त्वरित द्यावी.
सायबर क्राईम आधुनिक काळातील एक जागतिक समस्या कशी बनली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी व पालक यांनी काय काळजी घ्यावी, असे खुप मोलाचे मार्गदर्शन बाळासाहेब सकाटे साहेब यांनी केले.
कार्यक्रमासाठी पोलिस अंमलदार साईनाथ रोकडे, पत्रकार संरक्षण समिती पुणे अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे, मांजरी खुर्द गावचे पोलिस पाटील अंकुश राव उंद्रे, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शांताराम उंद्रे, संस्थेचे मान्यवर, मुख्याध्यापक जगदीश ठाकरे सर, भालेराव सर,संक सर, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महामुनी सर, सोनकांबळे सर,ढमे सर,सन्मुखे सर,सौ.लोंढे ताई,सौ.खैरनार ताई तसेच मान्यवर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रिडा शिक्षक चंद सर यांनी केले.
