दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:-आम्हाला शिकवू द्या.शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी या आणि अन्य प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापूढे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे, प्रदेश संघटक चंद्रकांत मेकाले यांचे मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने देशभरातील शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नावरून देशव्यापी आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवला असून चापूर्वी देशव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. दि.२४रोजी देशभरतील सर्व जिल्हाकचेरी समोर लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले.
शालेय उपक्रमांचा भडीमार थांबवून आम्हाला शिकवू द्या.६व्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करून त्याचा लाभ १जानेवारी २००६ पासून मिळावा.शिक्षण सेवक पद्धत बंद करून नियमित शिक्षकांची नेमणूक करावी.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी तरतुदी काढुन टाकाव्यात.जिल्हा/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुर्वीप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी. सन.2002 पासून निम शिक्षकांना सेवेचा लाभ देण्यात यावा.बदल्याच्या धोरणात सुधारणा करावी.शिक्षकांसाठी कँशलेस मेडीकल योजना लागू करा.शिक्षकांना अश्वासित प्रगती 10-20-30 योजनेचा लाभ द्यावा.शिक्षकांची अशैक्षणिक कामे कामी करावी.शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये.शा.पो.आ. योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवणे.आँनलाइन कामासाठी स्वंतत्र डाटा आँपरेटरची नेमणूक करावी.समान काम समान वेतन या धर्तीवरविषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी द्यावी.सर्व विद्यार्थ्यांसाठी गणवेश योजना लागू करावी व मुलींच्या उपस्थिती भत्यात वाढ करावी.कोणतीही मराठी शाळा बंद करू नये, शिक्षणातील खाजगीकरण बंद करा. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदे पदोन्नती व सरळ सेवा भरतीने प्राथमिक शिक्षकांतूनच भरावी. शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, सरचिटणीस प्रल्हाद राठोड,कार्याध्यक्ष सुधाकर थडके यांच्या नेतृत्वाखाली जयवंत काळे, माणिक कदम, गंगाधर मावले,ओमप्रकाश बलदवा,संतोष कदम, दत्तात्रय धात्रक, मिथून मंडलेवार,तुका पाटील,प्रभु सावंत, संजीव मानकरी,शिवाजी शिंदे, जी.टी.कदम, गुलचंद दासरे, शेख मुर्तूज, जनक गादगे, सूहास मूळे,बालाजी कवटीकवार, माधव परगेवार, उदय देवकांबळे, मारोती गायकवाड,मंगल सोनकांबळे, शिक्षक सेनेचे रवि बंडेवार,गुणवंत सोळंके,एम.टी.जाधव, सचीन कळसे,सुरेश बाऱ्हाळे, मोहसिन पठाण,अशोक सकनूरकर, व्यंकटेश भोगाजे, रवि ढगे, सौ. मंगलताई जिगळे, भूजंग पिल्लेवाड,रवि ढगे,किशोर नरवाडे, सुनील लष्करे,मंगेश हनवटे, बालाजी तोरणेकर, संघापाल वाठोरे, संजय वडवळे, आनंदराव सूर्यवंशी,सूनील सूर्यतळे,रामचंद्र बस्वदे, शंकर पाटील,बळी पाटील,माधव बनबरे, पी.डी.शिंदे. ए.एम.शिंदे,भगवान चव्हाण,अरुण डाकोरे, लक्ष्मण तोषटवाड, अनिल रणविर, पंडीत पांचाळ यांचेसह असंख्य शिक्षक उपस्थित होते.
