दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय पांगरी येथील मुख्याध्यापक मधुकर पवार यांची नुकतीच मराठवाडा मुख्याध्यापक संघाच्या ग्रामीण तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली असुन झालेल्या निवडीबद्दल मधुकर पवार यांना तालुकाभरासह जिल्हाभरातुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पांगरी येथील जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक मधुकर पवार सर यांची मुख्याध्यापक संघाच्या ग्रामीण विभाग तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षक स्टाॅप , डि जी एडके , मठपती सर , बुद्रुक सर , अंबेगावे सर , भुतावळे सर , डांगे सर , जाधव सर यांच्यासह सेवक कर्मचारी शिवाजी आंबेगावे यांनी सुध्दा सरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
