दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञ. दवणे..
मंठा तालुक्यातील ढोकसाळ येथे रात्री आठ वाजता शॉर्टसर्किटमुळे तीन दुकानांना आग लागून दुकानदाराची लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे..ही घटनादि. २० मार्चरोजी घडली.मंठा येथीलअग्निशामक दलाच्या अथक परिश्रमानंतर आगआटोक्यातआली ग्रामीणभाग असल्यामुळे तेथील मार्केट लवकरच बंद होते त्यामुळे तिन्ही दुकानदार आहे आपले दुकान बंद करून घरी गेले असता आजूबाजूच्या लोकांना दुकानातून धूर जाळ निघत असल्याचे समजले नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दल मंठा व पोलीस स्टेशन मंठा यांच्याशी संपर्क करून माहिती दिली.अग्निशामक दल वेळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, उपसभापती राजेश मोरे, विद्युत महावितरण चे उपअभियंता अनिल जंगम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी बोलताना अतुल बहिवाळ म्हणाले की माझे बहिवाळ जेल्बर्स ह्या दुकानची दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यात दागिने व दुकानचे फर्निचर संपूर्ण जळून खाक झाले आहे.
व शेजारी असलेले दीपक सोनुनकर यांचे पूजा हेअर सलून हेही संपूर्ण जाळून खाक झाले आहे. यामध्ये अंदाजे एक लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकानदार सोनुनकर यांनी दिली. या आगीमध्ये कोणतीही
जीवितहानी झाली नाही.
