दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
या विषयी अधिक माहिती अशी की जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२१चाअबियां बहाराचा रब्बी हंगामातील फळपीक विमा मंजुर झाला होता त्यासाठी एच डी एफ इरीगो या कंपनीने काही शेतकऱ्यांच्या खात्यावर परतावा जमा करुन चार महिने उलटले तरी अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न केल्याने आज दि.२१मार्च रोजी शेतकरी प्रतिनिधी रमेश तारगे सह घनसावंगी तालुक्यातील राजेगाव घनसावंगी बहिरेगड बोलेगाव बोधलापुरी मोहपुरी येथील शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी डॉ राठोड यांची भेट घेतली या आधी ही शेतकरयांनी भेट घेऊन या बाबत विमा परतावा कंपनी कडुन मिळाला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. होते जिल्हाधिकारी यांनी एक महिन्यापूर्वी सुद्धा कंपनी चे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब गोपाल यांना दुरध्वनी करुन शेतकऱ्यांच्या विम्याचा परतावा तातडीने द्यावा असे सांगितले होते तरी पण एच डी एफ सी इरीगो कंपनी कडुन टाळाटाळ केली त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने परतावा खात्यावर जमा झाल्या शिवाय कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ राठोड यांनी तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रणदिवे यांना बोलावून घेऊन कंपनी च्या प्रतिनिधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून या विषयी पुणे येथील कृषी संचालक कार्यालयात संपर्क साधला आणि याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला परतावा देण्यासाठी एक महिना भरात कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यावर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ३१मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर परतावा जमा करण्याची मागणी लावून धरली आणि शेवटी शेतकरी आक्रमक झाल्या मुळे कंपनी चे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब गोपाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रणदिवे यांनी संयुक्तपणे लेखी पत्र दिले यावेळी संभाजी गावंडे परमेश्वर काळे गणेश हेमके बाबासाहेब हेमके देवनाथ जगताप हरिदास बोरकर पंडीत हेमके भगवान हेमके विष्णु दिवटे प्रकाश सपाटे तुळशीराम सपाटे मधुकर साळवे कआगंनए सह असंख्य शेतकरी उपस्थित होते
