दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/काटकळंबा :- कंधार तालुक्यातील काटकंळबा येथे दि. ६ एप्रिल ते दि. ९ एप्रिल पर्यंत श्री.रेणुका देवी यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जंगी कुस्तीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेतील दैनंदिन कार्यक्रम दि ६ एप्रिल रोजी सकाळी १० वा देवीच्या आंबलीचा कार्यक्रम व रात्री ९ वा देवीचा गोंधळ, दि ७ एप्रिल रोजी सायंकाळी देवीची महापूजा, दि ८ एप्रिल रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम ,दि ९ रोजी कुस्त्यांचे सामने यामध्ये प्रथम पारितोषिक १११११ ,दुसरें पारितोषिक ७७७७ ,तिसरे पारितोषिक ५५५५ असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत नांदेड जिल्हा भाजपा सरचिटणीस श्री.प्रविण पाटील चिखलीकर ,अँड विजय धोंडगे उस्मानगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक पी डी भारती, शासकीय गुतेदार गणेश पा वाकोरे, शिवाजी पा वाकोरे व इतर मान्यवर मंडळीच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ दु ३ वा करण्यात येणार आहे.परिसरातील कुस्ती तसेच यात्रा प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी काटकळंबा,यात्रा कमिटी व ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
