दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दै.श्रमिक एकजूट, दै.एकमत चे पत्रकार व या परिसरातील ज्येष्ठ पत्रकार , एक निर्भिड व्यक्तीमत्व ग्रामीण पत्रकार म्हणून स्मरणात राहीलेले स्मृतीषेश कालवश धम्मदीप चावरे यांना पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा.विजय भिसे , माजी सरपंच प्रतिनिधी आमिनशा फकीर , पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे,शषिकांत भिसे यांनी का.धम्मदीप चावरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
