दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: नांदेड जिल्हयातील देगलूर तालुका हा तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने तेलंगणा प्रदेश राज्यातील पासींग असलेले ऑटो व क्रूझर देगलूर ते हैदराबाद कडे जाणारे टॅक्सी प्रवास मोठया प्रमाणावर देगलूर तालुक्यात होत असल्याने देगलूर तालुक्यातील परवानाधारक अँटोचालकावर उपासमारीची वेळ आली असून याकडे मात्र प्रशासन व अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून आर टी ओ चे अधिकारी व ऑटो चालकाचे संगनमत करून आर्थिक देवाण घेवाण करून देगलूर तालुक्यात होणारे अँटोचे अवैध प्रवासी वाहतुक मोठया प्रमणात सुरु असून पर राज्यातील अँटोंची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे. सर्वसाधारण ग्रामीण भागातील परवानाधारक असलेल्या ऑटो शहरात आढळून आल्यास त्यांना मोठया प्रमाणावर दंड आकारला जातो. परंतू देगलूर तालुक्यामध्ये परराज्यातील ऑटो अवैधरित्या प्रवासी वाहतुक करीत असताना प्रशासना मार्फत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात येत नाही.
देगलूर तालुक्यातील महाराष्ट्रातील अनेक जिल्हयामध्ये तेलंगणा राज्यातील मोठया प्रमाणावर ऑटो प्रवासी वाहतुक होत असल्याने महाराष्ट्रातील बेरोजगारीत मोठया प्रमाणात वाढ होत असून परवानाधारक ऑटो चालकाची मात्र उपासमारीची वेळ आलेली आहे. या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून पर राज्यातील ऑटो चालकावर लवकरात लवकर कारवाई करून वाहतूक बंद केली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूर तालुकाध्यक्ष मनमत परबते यांनी सांगितले. त्यावेळी
मन्मथ परबते
म.न.से. देगलूर तालुका अध्यक्ष
चंदू अक्केमवार म.न.से.प्रशहर अध्यक्ष देगलूर
गजानन वरसमवार म.न.से. जिल्हा उपाध्यक्ष नांदेड
विजय देशमुख
म.न.से. संघटक देगलूर
रमेशआप्पा बेंबरेकर म.न.से. देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष
विठ्ठल कोळगीरे
विजय देशमुख
म.न.से. संघटक देगलूर
म.न.से. देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष
विठ्ठल कोळगीरे म.न.से. शहर सचिव देगलूर
अभय कंदेवार
म.न.से. सोशल मिडिया देगलूर
आनंद कामशेट्टी
म.न.से. तालुका उपाध्यक्ष देगलूर
निखिल बक्कनवार
म.न.से. कार्यकता, देगलूर आधी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
