दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा येथील डॉ.सुनिल नारायण राठोड व सुधीर नारायण राठोड यांनी त्यांच्या जागेमध्ये विनापरवाना औषधी साठवणुक केल्याप्रकरणी औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्य्याच्या कलम २७(ब)(ii)अन्वये दोषीधरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश ०३, जालना मा.श्री.एस. आर. तांबोळी साहेब यांनी आरोपी डॉ. सुनिल नारायण राठोड व सुधीर नारायण राठोड, दोघे रा. मातृछाया हॉस्पीटल, शांतीनगर मार्केट यार्ड परीसर मंठा ता. मंठा जि.जालना, यांना त्यांच्या जागेमध्ये विनापरवाना औषधी साठवणुक केल्याप्रकरणी औषधी व सौंदर्य प्रसाधणे कायदयाच्या कलम २७(ब) (ii) अन्वये दोषीधरून तीन वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड.श्रीमती. एस. व्ही. कबनूरकर यांनी काम पाहिले.
थोडक्यात घटनेची हकीकत अशी की, आरोपी डॉ. सुनिल नारायण राठोड व सुधीर नारायण राठोड, दोघे रा. मातृछाया हॉस्पीटल, शांतीनगर मार्केट यार्ड परीसर मंठा हे त्यांच्या जागेमध्ये विनापरवाना औषधी साठवणुक करून विक्री करत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून अन्न व औषधी प्रशासनाच्या निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिनांक २२/११/२०१६ रोजी तपासणी करीता भेट दिली असता डॉ. सुनिल राठोड यांच्या मातृछाया हॉस्पीटल येथे विविध प्रकारची अॅलोपॅथीक औषधी विक्री करता साठवणुक केल्याचे आढळुन आले. सदर औषधांच्या बिल व विक्रीपरवाना याबाबत चौकशी केली असता तसा परवाना नसल्याचे आढळुन आले. यावरून औषध निरीक्षक श्रीमती अंजली मिटकर यांनी मा. न्यायालयात तक्रार दाखल केली.
सरकार पक्षातर्फे सदर या प्रकरणात औषध निरीक्षक श्रीमती अंजली मिटकर यांची साक्ष नोंदविण्यात आली त्यांची साक्ष महत्वाची ठरली.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व मा. न्यायालयापुढे आलेल्या साक्षीपुराव्या वरून कलम २७ (ब) (ii) अन्वये दोन्ही आरोपींना दोषीधरून तीन वर्षांची साध्या कारावासाची शिक्षा व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीमती. एस. व्ही. कबनूरकर यांनी काम पाहिले व त्यांना जिल्हा सरकारी कार्यालयातील कर्मचारी व कोर्ट पैरवी यांनी मोलाची मदत केली.
