दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी
लक्ष्मण कांबळे
नांदेड उस्माननगर :- येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते खायमशा कासीमशा फकीर यांचे नुकतेच ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी खायमशाह यांचा मुलगा व सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर व त्यांच्या परिवारास भेट देऊन सात्वन केले.
यावेळी त्यांच्या समवेत बालाजी परदेशी ( माजी जि.प.सदस्य कलंबर ) भ्रम्हानंद सिरसाठ , आशोक पाटील काळम , नरेश शिंदे ,मुजाहिद मौलाना ,मुखीद मौलाना , संभाजी काळम पाटील , यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
त्यानंतर उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार सभागृहात भेट दिल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे , माणिक भिसे, प्रदीप देशमुख , लक्ष्मण कांबळे, सुर्यकांत मालीपाटील, देविदास डांगे , संभाजी काळम पाटील , यांच्या सह गावांतील सामाजिक कार्यकर्ते बालाजी पुंडाजी घोरबांड , बापू कलंबरकर , आशोक पाटील काळम , नरेश शिंदे ,दत्ता घोरबांड , उस्माननगर येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रस्ताविक पत्रकार सुर्यकांत मालीपाटील यांनी केले होते.त्यांचा धागा पकडून एकनाथ पवार म्हणाले की , कंधार – लोहा विधानसभा मतदारसंघातील घराणेशाही थांबली पाहिजे , असे मत व्यक्त केले.व पुढे बोलतांना म्हणालेकी,यावेळेस परिवर्तनाची लाट असुन निश्चितच विकास करायचा असेल तर घराणेशाही संपुष्टात आणली पाहीजे व गावातील एखादे काम केलेकी,त्याचे नाव फलकावर दिसुन येत आहे तर आता परिस्थिती वेगळी आहे घराने शाहीतील आमदार ,खासदार, यांना असे वाटत आहेकी,आपल्याच घरान्यातील वारस पंचायत समिती सदस्य, सभापती,जि.प.सदस्य ,आमदार हे आपलाच वारस झाला पाहीजे असे राजकीय पुढा-यांना वाटत असते मी घराने शाही संपुष्टात आणण्यासाठी राजकीय मैदानात उतरलो आहे .लोहा- कंधार विधान सभा मतदार संघातील घराने शाहीला कंटाळले आहेत ते नविन नवयुवक, सुशिक्षित बेरोजगार तरूण, अल्पसंख्याक, यांना सोबत घेवून तिन वर्षा पासुन प्रत्येक गावात नविन कार्यकर्त्यांची फळी तयार करून विधान सभेसाठी घट्ट पकड निर्माण करत आहे.आज घडीला लोहा – कंधार मतदार संघातील ब-याच गावात ,खेड्यापाड्यात जान्यासाठी रस्ते नाहीत ,अंतर्गत रस्ते नाहीत,पिन्याच्या पाण्याची सोय नाही,व अनेक ठिकानी लाईटची सोय नाही ,अनेक मार्गावर बसेस नाहीत तरी काही गावात नाली,सिसीरोड झालाकी,विकास होत नाही तर तिथला विध्यार्थी स्वावलंबी बनला पाहीजे,शिक्षण दर्जेदार मिळाले पाहीजे,दळणवळणाची सोय झाली पाहीजे,ही सोय नसल्यामुळेच मी राजकारणात उतरलो आहे तरी तुमची मला सर्वांची साथ हवी असे शेवटी आपल्या भाषणातून म्हणाले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सूर्यकांत मालीपाटिल यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार गणेश लोखंडे यांनी केले…
