गडचिरोली प्रतिनिधी – जगदीश वेंन्नम
सिरोंचा :महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कर्मवीर स्व. मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त रेगुंठा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व औद्योगिक जडणघडणीसाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा उपस्थित मान्यवरांकडून गौरव करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात रेगुंठा येथे परिसरातील कापेवार व बेलदार समाज बांधवा कडून आयोजित महाराष्ट्रचे दुसरे मुख्यमंत्री स्वर्गीय कर्मवीर मारोतराव सा. कन्नमवार यांच्या जयंती उत्सवात साजरा करण्यात आला. “संघटित व्हा संघटित राहा आणि संघर्ष करा “अरुण मुक्कावार यांनी कापेवार व बेलदार समाज बांधवाना असे उपदेश दिलं.
कार्यक्रमाचे उदघाटक अरुण मुक्कावार कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद मेंगनवार कार्यक्रमाचे सह उदघाटक शाम बेजानीवार,
महत्त्वपूर्ण ठसा आणि व्यक्तिमत्त्व
मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते, जे २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या अल्प कालावधीसाठी पदावर होते आणि पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी पत्रकार, साहित्यिक आणि उत्तम राजकारणी म्हणून नाव कमावले; त्यांच्या काळात ओझरचा मिग विमान कारखाना आणि संरक्षण प्रकल्पांसारखी महत्त्वाची कामे झाली, तसेच त्यांनी संरक्षण निधीसाठी क्रिकेट सामन्यातून मोठी रक्कम जमा केली होती.
प्रमुख माहिती:जन्म: १० जानेवारी १९००, मूल (मरोडा), चंद्रपूर जिल्हा.
कार्यकाळ: २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ (महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री).
पार्श्वभूमी: वृत्तपत्र विक्रेता म्हणून सुरुवात केली, नंतर राजकारणात आले. ते भटक्या विमुक्तांमधील ‘बेलदार’ समाजातून आले होते.राजकीय कारकीर्द: स्वातंत्र्य चळवळीत सहभाग, काँग्रेसचे नेते, नागपूरचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष.महत्त्वाची कामगिरी:
ओझरचा मिग विमान कारखाना, वरणगाव, भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य कारखाने महाराष्ट्रात आणले.वाशी येथील खाडीपुलाची (हार्बर ब्रिज) कल्पना त्यांचीच होती.
१९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण निधीसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून मोठी रक्कम (सुमारे ७.९१ कोटी रुपये) जमवली.निधन: २४ नोव्हेंबर १९६३ रोजी पदावर असतानाच निधन झाले.
मारोतराव कन्नमवार यांनी कमी वेळेत महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विकासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला, असे व्यक्तिमत्त्व होते.
या वेळी अध्यक्ष सिरोंचा प्रमुख अतिथी सतिश तोटावार अध्यक्ष अहेरी, महेश मुक्कावार अहेरी सुनील बेझलवार अहेरी, श्रीमती प्राजक्ता पेद्दापल्लीवार अहेरी, सौ. शालिनी मुक्कावार अहेरी, सौ. सारिका गडपलीवार अहेरी, जगदीश रालबंडीवार नगरसेवक सिरोंचा, नरेश तडकलवार सिरोंचा, प्रकाश पुपालवार,से. नि. नायब तहसीलदार, सत्यनारायण परपटलावार माजी उपसभापती सिरोंचा रमेश पोलमपली मुख्याध्यपक मुलदिमा, श्रीनिवास कडार्ला उपासरपंच विट्टलरावपेठा, लसमय्या नलगुंठा उपासरपंच नर्सिंहापल्ली, राजु कडार्ला रेगुंठा, व्यंकन्ना चुककावार तंटामुक्ती अध्यक्ष विट्टलरावपेठा, सत्यनारायण पोलमपलीवार, सत्कार्मुर्ती पेदान्ना इंदुरी सेनिशिक्षक, रविंद्र पोलमपलीवार केंद्र प्रमुख रेगुंठा, रमेश पोलमपलीवार मुख्याध्यपक, श्रीमती पदमा गंडुवार मुख्याध्यपक, तिरुपती बेजजनीवार मुख्याध्यपक व्येंकटेश मच्चावार मुख्याध्यपक, सांबय्या शेट्टीवार, संतोष चंदावर, मुख्याध्यपक प्रास्ताविक व संचालन रविंद्र पोलामपल्ली यांनी केला होता.आयोजक सत्यनारायण कडार्ला,सतिश कडार्ला, निरज गंडुवार, नरेश चुक्कावार, राकेश चुक्कावार, संतोष कासेट्टीवार,सतिश इंदुरी, चंद्रशेखर कडार्ला,महेंद्र मच्चावार,मालिकार्जून कडार्ला, सरिता बापू मच्चावार, पदमा अशोक सल्लावार, राजेश्वरी तिरुपती गंडुवार, सपना कडार्ला, रेखा कडार्ला, ममता कडार्ला, लावण्या चुक्कावार,सुस्मिता कडार्ला,व्येकम्मा कडार्ला,परिसरातील सर्व समाज बांधाव उपस्थिती होते.
