दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी/ अरविंद पवार
अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कृषी महाविद्यालयांतून निवड झालेले विशेष प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या शिबिरासाठी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक कु. जयश परसराम राठोड यांची निवड झाली आहे. त्यामुळे ते आता परभणी कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या निवडीसाठी जयश राठोड यांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एल. चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. बी. व्ही. आसेवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. आर. डी. अहिरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, कॅम्पस प्रभारी अमर शेजुल, कृषी प्रशासकीय अधिकारी तुषार नगरे, विजय ढगे तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या राज्यस्तरीय शिबिरातील सहभागामुळे आपत्ती व्यवस्थापनातील प्रत्यक्ष प्रशिक्षण, नेतृत्वगुणांचा विकास व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होणार असून, जयश राठोड यांच्या यशामुळे खंडाळा परिसरासह वैजापूर तालुक्याचा गौरव वाढला आहे.
