दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी-अरविंद पवार
वैजापूर तालुक्यातील पोखरी–साकेगाव रस्त्याची दुरवस्था आता गंभीर बनली असून गावाजवळील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. सदर सिमेंट रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे काही महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.
शुक्रवारी वळण येथील शाळेत जाणाऱ्या एका शिक्षिकेची दुचाकी रस्त्यावरील खड्यात आदळून त्या जखमी झाल्याची घटना घडली.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी रस्त्याची अवस्था पाहता भविष्यात गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराला व संबंधित यंत्रणेला वारंवार सूचना देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून खड्डे बुजवण्यात यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश मालोदे यांनी दिला आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास
