दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी- पैठण प्रतिनिधी
छ. संभाजीनगर (पैठण): मराठी पत्रकारितेचा पाया घालणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने रोटरी क्लब पैठणच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार पैठण येथील सकाळचे ज्येष्ठ पत्रकार गजानन आवारे यांना आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रोटरी क्लब पैठणने यंदापासून पत्रकारीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार यंदा पासून सुरू केला असून तो यंदाच सकाळचे बातमीदार गजानन आवारे यांना आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पैठणच्या नगराध्यक्षा विद्या कावसनकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष गोपाळ जगताप, रोटरी क्लब सचिव पवन लोहिया, उपाध्यक्ष बळराम लोळगे, जिल्हा दूध संघाचे संचालक नंदलाल काळे,माजी प्राचार्य रामदास वल्ले, रो. जालिंदर फलके ,रो.डॅनियल इंगळे, पत्रकार हबीब खाॅ पठाण,दादासाहेब गलांडे,मुफीद पठाण, रमेश शेळके, तुषार नाटकर, व्यापारी महासंघाचे पैठण शहराध्यक्ष स्वदेश पांडे,सचिव उमेश तट्टू सह मान्यवर उपस्थित होते.
समाज प्रबोधनासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने दिलेल्या योगदानाची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आल्याचे रोटरी क्लब चे ट्रेनर तथा मुख्य मार्गदर्शक सेंट पॉल्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक तथा रो.फादर डाॅ व्हॅलेरियन फर्नांडिस यांनी सांगितले.
“लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची समाजात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सत्य आणि निर्भीड पत्रकारितेमुळेच समाज प्रबोधन होते. रोटरी क्लब पैठणसारख्या सामाजिक संस्थांनी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करून आदर्श परंपरा जपली आहे. गजानन आवारे यांनी समाजहितासाठी केलेल्या पत्रकारितेचा हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे.”
-विलास भुमरे,आमदार,पैठण
यंदापासून पैठण रोटरी क्लबच्या वतीने पैठण तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर रोटरी पुरस्कार सुरू केला असून यंदाच्या पहिल्याच वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी सकाळचे बातमीदार गजानन आवारे हे झाले आहे त्यांनी सतत सामाजिक, शैक्षणिक व जनतेच्या समस्यावर लिखाण केलेले आहे त्यामुळे आम्ही त्यांना सदर पुरस्कार दिला आहे.
– गोपाळ जगताप, रोटरी क्लब अध्यक्ष, पैठण.
—–
