दैनिक चालू वार्ता वैजापूर प्रतिनिधी – भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर:-) न्यू हायस्कूल सिद्धनाथ वाडगांव येथील शाळेतील दहावी बॅच २००१ या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी ६ एप्रिल रविवार रोजी स्नेह भेट घडवून आणली. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किसनराव कवाळ हे उपस्थित होते, गुरुजनांचे वतीने मा. नेमाने सर, खरात सर, गराडे सर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सध्या शाळेत रुजू असलेले शेजवळ सर यांनी केले, त्याचं बरोबर जोनवाल सर व टूपके मामा हजर होते.
विद्यार्थांच्या वतीने खालील माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनि आवर्जून उपस्थिती दर्शविली जीवन दिवेकर ,कलीम शेख, अबरार शेख, संदीप राजपूत,अविनाश सुराशे, अजिनाथ त्रिभुवन, इकबाल पठाण,सत्तार पठाण, जबीर शेख, फारुख शेख,अनिल वाघ ,मुकेश राजपूत, संजय ठिल्लार, गौतम बागुल, रमेश नागे पंढरीनाथ गंडे,जयसिंग राजपूत,सतीश चव्हाण,सिद्धार्थ भालेराव,प्रमोद काकडे ,भारती राजपूत ,अर्चना भालेराव , मयुरी मुळे , चंदा राजपूत , सीमा राजपूत , गंगा जोनवाल, छाया भालेराव, रीना गंडे, मनीषा राजपूत हे होतो. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून उपस्थित अध्यक्ष आणि सरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांचे शिकवणीचे शब्द सुमनात आभार मानले. तसेच जीवनात आलेल्या संकटाना शिक्षणाने कशी मात केली याचा ही पाडा वाचण्यात आला.
त्याचप्रमाणे आदरणीय गुरुजनांचे भावनिक जुन्या आठवणीचा बोलपट ऐकला मिळाला, त्याच प्रमाणे धार्मिक,अध्यात्मिक शिक्षण ही काळाची गरज आहे या आशयाचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर प्रतिभोजन झाले आणि कार्यक्रमाची सांगता गुरुजनांचे आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
