{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
दिवा प्रतिनिधी (नागेश पवार) – ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती हद्दीतील प्रभाग क्रमांक २९ या पॅनलच्या तिन्ही अधिकृत उमेदवारांसह कल्याण ग्रामीणचे मा.आमदार सुभाष भोईर यांनी असंख्य भाजप व शिवसेनेचे कार्यकर्त्यांना घेऊन आज साबेगाव भागातून प्रचाराला सुरवात केली. भौगोलिक दृष्ठ्या जरी प्रभाग क्रमांक २९ चा अधिकांश भाग हा जरी खाडी पलीकडे असला तरी देखील दिवा-साबेगाव येथील मतदारांचे मतदानच या प्रभागातील उमेदवारांना जिंकण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत याची सर्वांना कल्पना आहे.
मा.आमदार सुभाष भोईर यांचा आजचा झंजावती प्रचार दौरा म्हणजे महायुतीच्या सर्व उमेदवारांची विजयाकडे वाटचालच म्हणावी लागेल, कारण दिवा-साबेगाव भागात असलेला भोईर यांचा घनदाट जनसंपर्क व त्यांच्यावर प्रेम, निष्ठा असलेली जनतेचा ठाम पाठिंबा.
तर प्रचारासाठी आमदार भोईर यांसह कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून सौ.वेदिका साहिल पाटील (भाजपा उमेदवार) यांसह प्रभाग क्रं.२९ मधील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी प्रभागातील जनतेला केले.
