ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
ठाणे, दि.2४ :- बदलापूर पश्चिम येथील ज्युनियर के.जी. मध्ये शिकणाऱ्या 04 वर्षीच चिमुकलीवर एका स्कुल व्हॅनचालकाने लैंगिक अत्याचार केला असून बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र. 022/2026, दि. 22 जानेवारी 2026 (बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012, कलम 12, 8, 351(2), 351(3) तसेच भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 74, 75) नोंदविण्यात आला आहे.
तसेच गुन्ह्यातील जप्त वाहनास मोटार वाहन नियमाप्रमाणे रु.24000/- दंडात्मक कारवाई करून वाहनाची नोंदणी निलंबन करण्याकरीता वाहनमालकास कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी वहनचालक यांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे.
माहे जाने 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 259 वाहनांवर स्कुलबस नियमाप्रमाणे कारवाई करून रु. 7.83.000/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच माहे जानेवारी 2026 या महिन्यामध्ये एकूण 39 वाहनांवर कारवाई करून रु. 1,40,000/- दंड वसुल करण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयातर्फे सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या पाल्यास कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

