दिवा- श्लोक नगर फेस-२, मुंब्रादेवी कॉलनी येथे आज “श्री शिव साई” सार्वजनिक महादेव मंदिराचे जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला. धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.अमोल धनराज केंद्रे व सौ.अश्विनी अमोल केंद्रे यांच्या वतीने “श्री शिव साई” सार्वजनिक महादेव मंदिराचे जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठान सोहळा २६ जानेवारी २०२६ रोजी पार पाडण्यात आला.
मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी महादेवाची पूजा अर्चना केली जात असून आसपास राहणाऱ्या भक्तांच्या भावना विचारात घेऊन येथे “श्री शिव साई” मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा मानस सामाजिक कार्यकर्ते तथा धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी केला होता अखेर हा मानस आज रोजी पूर्ण झाला असल्याने विभागातील अनेक शिव साई भक्तांनी त्यांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्तीथी लावली.

