दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मंनधरणे
चैनपूर ता. देगलूर येथील ग्रामविकासाला गती देणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. गावातील अंतर्गत सी.सी. रस्ते, पथदिवे उभारणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती या महत्त्वाच्या ९० लक्ष रु.निधिच्या कामांचा भूमिपुजन यावेळी करण्यात आला.
गावकऱ्यांच्या मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे आ. अंतापूरकर यांनी यावेळी सांगितले. विकासकामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास परिसरातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आ. अंतापूरकर यांनी गावातील हरीनाम व शिवनाम सप्ताहास भेट देत भजनी मंडळ व ग्रामस्थांसोबत हरिनामाच्या गजरात सहभागी होत भक्तिरसात तल्लीन झाले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
यानंतर शहापूर येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडींचे दर्शन त्यांनी घेतले. तसेच शेळगाव नृसिंह येथे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेत वारकऱ्यांशी संवाद साधला.
विकासकामांसोबतच सामाजिक व धार्मिक उपक्रमांना दिलेले प्रोत्साहन हे लोकप्रतिनिधी म्हणून आ. अंतापूरकर यांचे संवेदनशील नेतृत्व दर्शवते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या भुमिपुजन कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपसरपंच मारोतीराव हनेगावे व सरपंच प्रदीप वाघमारे यांनी केले तर
यावेळी नांदेड जिल्हा परिषदेकडून माजी शिक्षण सभापती माधवरा मिसाळे सर, मा. जि.प सदस्य अनिल पाटील खानापूरकर, तसेच भाजपा नेते ताराकांत पाटिल नरंगलकर, हाणमंत डोपेवाड, रमेश पाटील वनाळीकर, तुकाराम कोकणे, सुरेश अना नावेकर, बुथ अध्यक्ष राजू ईबितदार, नामदेव कायतवाड, पापना दंडलवाड, संजय नामपले, प्रशांत बोरवाड, विठ्ठल देशमुख, राम पाटील, हाणमंत हनेगावे आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
