औसा प्रतिनिधी- जीवन जाधव
खरोसा येथील प्रचार सभेत शेतकर्याच्या लेकरांना निवडुण दया जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांचे प्रतिपादन,
औसा तालुक्यात होउ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत खरोसा जिल्हा परीषद गटातील खरोसा येथील छञपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहिर सभा संपन्न झाली ,महाविकास आघाडीचे खरोसा जिल्हा परीषद गटाचे अधिक्रत उमेदवार तानाजीराव जाधव ,खरोसा पंचायत समितीचे उमेदवार शितलताई फावडे ,कारला पंचायत समितीचे उमेदवार विलास काळे यांच्या प्रचारार्थ काॅग्रेस प्रदेशचे सचिव श्रिशैल्य दादा उटगे ,लातुर काॅग्रेस जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके ,शिवसेना(उ.बा.ठा)
पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थीतीत भव्य प्रचार सभा संपन्न झाली .यावेळी काॅग्रेस जिल्हाध्यक्ष अभय दादा साळुंके यांनी हि लातुर हाय पिल्लु मनत उपस्थितांची मने जींकली , खरोसा जिल्हा परीषद गटाचे उमेदवार तानाजी जाधव यांनी गटातील अनेक लोकांची कामे केली आहेत ,व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तानाजीरावांना जिल्हा परीषदेत काम करण्याची संधी दया त्यांच्याकडुन काम करुन घेण्याची जबाबदारी माझी असल्याची संतोष सोमवंशी यांनी सांगीतले ,
भारतीय जनता पक्षाने आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने
व पैसेवाले गुत्तेदार व सावकार लोकांना तिकीट वाटपात प्राधान्य दिल्याने प्रत्येक गटात सावकार व पैसेवाल्यांना निवडुण देउ नका अस संतोश सोमवंशी यांनी सांगीतले यावेळी
खरोसा जिल्हा परीषद गटातील महाविकास आघाडीचे खरोसा जिल्हा परीषद गटातील उमेदवार तानाजी जाधव ,खरोसा पंचियत समिती उमेदवार शितल फावडे ,व कारला पंचायत समिती उमेदवार विलास काळे यांच्या समोरील मशाल व हात चिन्हाला मतदान करुन भरघोस प्रचंड बहुमताने विजयी करा अस आवाहन यावेळी करण्यात आले ,यावेळी व्यासपिठावर काॅंग्रेसचे प्रदेश सचिव श्रिशैल्य उटगे , काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके,शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी ,काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण बाबळसुरे ,युवक विधानसभा अध्यक्ष संजय लोंढे ,अक्षय खरपडे, खरोसा सह खरोसा जिल्हा परीषद गटातील पंचायत समिती कारला व खरोसा गणातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते
