भारताला पूर्ण…
भारत आणि रशियाचे संबंध कायमच चांगली राहिली आहेत. मध्य पूर्वेत मोठे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. या युद्धाच्या काळात भारताच्या मदतीला रशिया धावून आला.
जगात कच्चे तेल आणि गॅसची मोठी समस्या आहे. युद्धामुळे आजच्या घडीला अनेक देशांची वाट लागली. होर्मुज खाडी बंद असल्याने कोणताही मार्ग निघत नाहीये. परिस्थिती अधिक बिघड चालली आहे. भारताची स्थिती अत्यंत चांगली आहे. त्या तुलनेत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये स्थिती भीषण आहे. होर्मुज खाडीतून आणि रशिया कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतात कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा करत आहेत. यादरम्यानच आता भारतीयांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. परिस्थिती कोणतीही असो आम्ही तुमच्यासोबत असल्याचा मोठा संदेश थेटपणे रशियाने दिला.
नुकताच आता रशियाने भारताला जास्त तेल आणि नैसर्गिक गॅस पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला. हेच नाही तर रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मांतुरोव स्वत: भारत दाैऱ्यावर आले आणि भारताला नैसर्गिक गॅस आणि तेलाचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीमध्ये करणार असल्याचा प्रस्ताव दिला. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी भारताला मोठा प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावात त्यांनी भारताला भविष्यात नैसर्गिक गॅस आणि जास्त प्रमाणात तेल पुरवठा देणार असल्याचा प्रस्ताव दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावरून स्पष्ट होते की, भारताच्या मदतीकरिता रशिया खंबीरपणे उभा आहे.
सध्याच्या घडीला रशियाच्या तेलाची जगात मोठी मागणी आहे. खाडी देशातून होणारा तेल पुरवठा खंडीत झाला. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशाचे जहाज तिथे अडकली आहेत. जगाला पुन्हा एकदा रशियाने दाखवून दिले की, भारतासोबतची त्यांनी मैत्री नक्की कशी आहे. पाकिस्तानमध्ये तेलाचा मोठा तुटवडा आहे. लॉकडाऊन लागण्याची स्थिती आहे. भारतात कच्चे तेल आणि एलपीजी गॅसचे जहाज दाखल होत आहेत.
