दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नाशिक जिल्ह्यांतील सिन्नर तालुक्यांतील कणकोरी गावचे सुपुत्र गणेश संपत जगताप ( वय ३५) हे भारतीय सैन्य दलामध्ये गेली १४ वर्ष देशसेवा करीत होते. गणेश जगताप यांच्यावर शनिवारी शासकीय मानवंदना देवुन जवान जगताप यांना अखेरचा निरोप देण्यांत आला. जवान गणेश जगताप हा सुट्टी संपवून चारच दिवसांपूर्वी आपल्या कर्तव्यावर हजर झाला होता. परंतु त्याची अचानक प्रकृती बिघडल्यांने सहकाऱ्यांनी त्याला दिल्लीमधील लष्करी रुग्णालयांत दाखल केले असता. उपचार दरम्यान जवान गणेश जगताप यांची बुधवारी सायंकाळी प्राणज्योत माळवली. (गणेश हा सुट्टी संपवून जाताना आई आणि पत्नीला यंदा दिवाळीच्या सणाला येतो असे सांगून आपला निरोप घेतला होता. मात्र नियतीच्या काळाने गणेश जगताप यांच्या दिवाळीत भेटण्यांचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले) जवान गणेश जगताप यांचे पार्थिंव कणकोरी गावामध्ये दाखल होताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे त्यांचे डोळे पाणवले. त्यानंतर गणेश जगताप यांचे पार्थिव काही कालावधीनंतर अंत दर्शनासाठी ग्रामपंचायत समोर ठेवण्यांत आले. यावेळी सिन्नर तालुक्यांतील राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जवान गणेश जगताप यांच्या पार्थिंवांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर शासकीय मानवंदना देवुन गणेश जगताप यांना उपस्थिंत जनसमुदायांच्या वतीने मानवंदना देत अखेरचा निरोप घेतला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, माजी जिल्हा परिषद प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे नगरसेवक दिनकर पाटील, प्रभारी तहसिलदार प्रशांत पाटील,पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह ग्रामस्थांनी मानवंदना दिली.
