दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-राष्ट्रिय चर्मकार महासंघ चांदुरबाजार युवा तालुका अध्यक्ष म्हणुन कार्यरत असलेले करजगाव बहिरम येथील रहिवाशी अविनाश तायडे यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप,रविंद्र राजुसकर,गजानन भटकर,निलेश जामठे यांच्या हस्ते अमरावती येथील सर्कीट हाऊस येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये नियुक्तीपत्र देऊन युवा जिल्हाध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजाच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी तसेच विविध विधायक काम करणे हा उद्देश मनात ठेवून समाजातील तरुण जे सतत सामाजिक प्रश्नाची जाणीव मनात ठेवतात,समाजातील अडी-अडचणीला धावून येतात.समाजाला योग्य मार्गदर्शन करून सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतात.अशा युवकांची पदाधिकारी म्हणुन जिल्हयात निवड करण्यात यावी.असे उद्गार बैठकीला बबनराव घोलप यांनी व्यक्त केले.
यावेळी अविनाश तायडे यांनी चर्मकार समाजातील युवा तरुन तसेच समाज बांधवाना संघटीत करुन महासंघाच्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याचे काम करुन,समाजाला न्याय हक्क मिळवुन देण्याकरिता सदैव तत्पर राहुन लढा देण्याचे कार्य करु असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.या निवडीचे श्रेय अविनाश तायडे हे राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे राष्ट्रिय प्रवक्ते रविंद्र राजुसकर,प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर,युवा प्रदेश अध्यक्ष नितीन शेरखाने,मनोज म्हैसधुणे,जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,राजेंद्र तांबेकर,शेषराव गव्हाळे,श्यामकुमार आकोडे,गजानन वानरे,विजय शेकोकार,जगदेव रेवसकर यांना दिले आहे.अविनाश तायडे यांची युवा जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल चेतन खंडारे,दिलीप वरजे,विश्वभंर तायडे,किशोर शेकोकार,वसंत रेवसकर,हेमत मानकर,महेश बोरकुटे,मनोहर कोथळकर,देवेंद्र पिढेकर,गजानन चांदणे,विठ्ठल विजेकर,आशिष गोडबोले,सुरज लेवटे,किरण पानझाडे,कैलास पाचखंडे,शुभम पाचखंडे,संगम हिरे,आकाश भटकर,पंकज भटकर,प्रवीण माटे,अजय तायडे,वासुदेव गोरे,गजानन चव्हाण,सुधीर चव्हाण,प्रमोद कोठेकर,गोलू सावरकर,देवेंद्र सावरकर,विलास खंडारे सोपान नाचणे,रामेश्वर तायडे,राजेश तायडे,योगेश आवारे,रोशन तायडे आदिसह समाजबांधवानी स्वागत केले आहे.
