दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधि:
मौजे सांगवी( क) येथे पहीला (१) सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रथराज परमरहस्य पारायण सोहळा आयोजित केले असून या कार्यक्रमाचे प्रारंभ ता.२६ रोजी रविवारी होत असून सप्ताहाचे महाप्रसाद ता.२ रोजी रविवारी या कालावधीत आहे.
राष्टसंत सदगुरु डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज व सदगुरु सिध्देश्वर शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या प्रेरणेने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या हस्ते कळस पूजनाने
अखंड शिवनाम सप्ताहाचा सुरुवात होत आहे.दरम्याण सदगुरु ष.प.ब्र.१०८ श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर यांच्या हस्ते ता.१ एप्रिल रोजी शनिवारी सकाळी ८ वाजता सप्ताहस्थळी शिवदिक्षा कार्यक्रम सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात सदगुरु ह.भ.प.श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर
सदगुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर,सदगुरु श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज हाणेगावकर,सदगुरु श्री डाॅ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे प्रवचन व आर्शिवाद लाभणार आहे.
दरम्याण शिवकिर्तनकार शि.भ.प.कावेरीताई मुदखेडे,शि.भ.प.भाग्यश्रीताई पाटील,शि.भ.प.किर्तीताई स्वामी,शि.भ.प.तुकाराम महाराज साखरे,शि.भ.प.राजेश्वर महाराज लाळीकर,शि.भ.प.अमोल महाराज लांडगे बनवसकर,शि.भ.प.विश्वनाथ महाराज पेनूरकर यांचे किर्तन होणार असून ता.१ एप्रिल रोजी टाळआरतीचे किर्तन शि.भ.प.किशोरीताई ताकबीडकर यांचे तर, ता.२ एप्रिल रोजी रविवारी महाप्रसादाचा किर्तन शि.भ.प.शिवानंद महाराज दापशेडकर यांचे होईल व तदनंतर महाप्रसादचा कार्यक्रम होईल.या अखंड शिवनाम सप्ताहात सुप्रसिध्द गायक व वादकांची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाचे पंचक्रोशीतील सर्व सदभक्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहण सांगवी( क) येथील गावकर्याकडून करण्यात आले आहे.
