दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातील परळी नाका परिसरात परभणी रोडवर चंद्रकांत काळे यांचे आशिष ट्रेडिंग कंपनी शेतमाल खरेदी विक्री केंद्र आहे. या दुकानातील कापूस ट्रकमध्ये भरत असताना विजेच्या तारेचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे या केंद्रास आग लागली. या आगीत ५०० क्विंटल कापूस तर ३०० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे.
अधिक माहिती अशी की,परभणी रोडवर असलेल्या आशिष ट्रेडिंग कंपनी या शेतमाल खरेदी- विक्री केंद्रातील कापूस शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी दुपारी ४ च्या सुमारास ट्रकमध्ये भरला जात होता. यावेळी गाडी भरत असताना विजेची तार ट्रकमधील कापसाला लागल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. व काही क्षणातच ही आग झपाट्याने शेतमाल खरेदी- विक्री केंद्रातील आतील भागात पसरली.
या आगी मध्ये दुकानातील व या ट्रक मधील सुमारे ५०० क्विंटल कापूस व दुकानात असलेले ३००क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
