दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा.अमरावती विभाग अमरावती व अकोला जिल्हा स्वयंसिद्धा असोसिएशन, महाराष्ट्र स्वयंसिद्धा यांच्या सयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्वयंसिद्धा महिला स्वसरक्षण प्रशिक्षण शिबीर वर्ष २३-२४ मध्ये कु. गुंजन प्रभाकर पाचभये व कु. प्रांजली राजेंद्र कौराईक या आष्टी तालुक्यातील दोन मुलींनी प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची स्वयंसिद्धा महिला स्वसरक्षणचे तालुका नियंत्रक म्हणून निवड झाली आहे. तसेंच कु.लीना निलेश घाटवाडे ह्या तीन मुलींची राष्ट्रीय मध्ये निवड झाली आहे त्याअनुषंगाने आष्टी तहसीलदार सचिन कुमावत यांनी पुष्पगुच्छ व पारितोषित देऊन त्यांचे अभिनंदन केले सोबत वनरक्षक गोविंद सोनल, नितीन डोईफोडे अमित इंगळे,अनिल मोक्कदम,सुरेंद्र भनेरकर,दिनेश चव्हाण,निलेश घाटवाडे होते त्यामुळे आष्टी तालुका क्रीडा संकुलाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे
