दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
हज कमिटी ऑफ इंडिया मार्फत २०२३ मध्ये हज यात्रेकरूंना हज यात्रेला जाण्यासाठी भारतामध्ये २२ विमानतळे निश्चित करण्यात आली आहेत. मराठवाडा मधील औरंगाबाद येथील एका विमानतळाचा यामध्ये समावेश आहे. परंतु मुंबई पेक्षा औरंगाबाद येथून प्रस्थानासाठी प्रत्येक यात्रे करूला ८८,०००/ रु. जास्त आकारण्यात येत आहेत. प्रत्येक यात्रे करूने सीईओ हज कमिटी ऑफ इंडिया कडे प्रस्थान स्थळ बदल्यांचा अर्ज देखील केला आहे.
आज या संदर्भात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन हा विषय महेबुब शेख यांनी शरद पवार यांच्या कड़े मांडला असता श्री पवार यांनी तात्काळ केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती ईराणी यांना पत्र देऊन संपर्क साधला आणि हा विषय सोडवण्याची विनंती केली. शरद पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावण्यासाठी सांगितले.
