दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी -अनिल सूर्यवंशी
दिल्ली लोकसभा संसद येथे केंद्रीय कृषी, ग्रामीण विकास तथा किसान कल्याण मंत्री मा श्री_शिवराज सिंह चौहान साहेब यांची खासदार मा श्री डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज कार्यसम्राट आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे सर यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या विषयी सविस्तर अशी चर्चा करत रोजगार हमी योजनेतून चालू असलेल्या कामांना निधी उपलब्ध नसल्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री महोदय यांना आमदार साहेबांनी केली.
याप्रसंगी खासदार श्री डॉ श्रीकांत शिंदे साहेब, खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब, खासदार श्री संदिपानजी भुमरे साहेब, रोजगार हमी मंत्री श्री भरतजी शेठ गोगावले, सचिव श्री नंदकुमार साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप उपस्थित होते.
