खुशबू पटानीच्या कृतीनं समाजमन दरवळलं…
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानीचे सर्वत्र कौतुक होत आहे. खुशबूला, तिच्या बरेलीतील घराजवळ असलेल्या एका पडीक जागेवर एक मुलगी सापडली होती. कोणीतरी त्या मुलीला तेथे सोडून दिल होतं.
या लहान मुलीचा रडण्याचा आवाज खुशबूला ऐकू आला. त्यानंतर त्या आवाजाच्या दिशेने खुशबू तेथे गेली. तिने त्या मुलीचा जीव वाचवला. त्या मुलीला खुशबू घरी घेऊन गेली.
आता, पोलिसांच्या मदतीने खुशबूने त्या मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले आहे. खुशबूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मुलगी सापडल्याची माहिती दिली होती. आता तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने सापडलेल्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले आहे.
खुशबू भावूक झाली
जेव्हा ती मुलगी तिच्या पालकांसह तिच्या घरी जाऊ लागली, तेव्हा खुशबू भावुक झाली. मुलीला घरी आणल्यानंतर, खुशबूने तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. जेणेकरून पोलिस तिच्या पालकांना शोधू शकतील. आणि मुलीची ओळख पटवू शकतील. खुशबूने नवीन व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “माणसाचे हृदय किती सुंदर असते. मला तिची आठवण येईल. पोलिसांना तिचे पालक सापडले आहेत. वैद्यकीय मदत आणि तात्काळ मदतीसाठी पोलिसांचे आभार.
खुशबू पटानी मुलीला काय म्हणाली?
व्हिडिओमध्ये खुशबू रुग्णालयात त्या मुलीसोबत दिसत आहे. मुलगी बेडवर झोपली आहे. जेव्हा ती मुलगी रडू लागते तेव्हा खुशबू तिला आपल्या जवळ घेते आणि सांगते की, तू खूप खास आहेस, तुला खूप त्रास देण्यात आला, पण तुला काहीही झाले नाही. ‘तू मला सोडून जात आहेस, मला एकटे सोडू नकोस.
मुलगी बिहारची आहे
या प्रकरणी, माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही मुलगी बिहारची आहे. तिची आई तिच्या मुलीसोबत बरेलीहून बिहारला जात होती. त्याच वेळी, बरेली जंक्शनवरून एका तरुणाने तिच्या मुलीला घेऊन पळ काढला होता. नंतर, ती मुलगी खुशबू पटानीला तिच्या घराजवळच्या पडीक जागेवर सापडली. खुशबूच्या या कामगिरीमुळे तिचे कौतुक होत आहे. तसेच सोशल मीडियावर लोक तिचे खूप कौतुक करत आहेत. दिशा पटानीनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. दिशाने लिहिले, तू खरोखरच एक खरी हिरो आहेस. तुम्हा दोघांनाही आशीर्वाद मिळो.
कोण आहे खुशबू पटानी
अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी, जी माजी लष्करी अधिकारी आहे. खुशबू पटानीचा जन्म २३ नोव्हेंबर १९९१ मध्ये झाला. तिचे वडील, जगदीश सिंह पटानी हे उत्तर प्रदेश पोलिस विभागात डिप्टी सुपरिटेंडेंट (DSP) म्हणून कार्यरत होते. खुशबूची छोटी बहीण दिशा पटानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
