
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी -बापू बोराटे
पुणे (इंदापूर):-महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू करण्यात आले आहे,अशी माहिती शेटफळ हवेली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक बी.ए.शिंदे यांनी दिली. शेटफळ हवेली ग्रामपंचायत च्या वतीने आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबविणे बाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी त्यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली.
हे अभियान केवळ स्पर्धात्मक नसून, ग्रामविकासाच्या लोकचळवळीला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल,असे यावेळी त्यांनी सांगितले.
अभियानाचा उद्देश
या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे, आणि विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसून, ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारलेली आहे.
अभियानाचे मूल्यमापन:
एकूण १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पारदर्शक प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार, पर्यावरण, कर वसुली, लोकसहभाग या बाबींचा समावेश आहे.
तंत्रज्ञानाचा वापर:
प्रत्येक ग्रामपंचायतीकडून दररोज कामाचा अहवाल विशेष App आणि वेबसाईटवर भरला जाईल. यासाठी आधीच प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रसार व जनजागृती:
प्रत्येक गावात प्रचारासाठी कार्यशाळा, पोस्टर, बॅनर, सोशल मिडिया, यशोगाथा फिल्म्स, तांत्रिक सल्लागार, इत्यादी माध्यमांचा वापर केला जाणार आहे. व्यापक जनजागृतीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद आहे.
ही योजना केवळ स्पर्धा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन आहे. प्रत्येक गाव, पंचायत आणि नागरिकाने हे अभियान आपले समजून काम केले तर गावाचा चेहरामोहराच बदलू शकतो. त्यामुळे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान” ग्रामीण विकासाच्या दिशेने शासनाचे एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे, असे ग्रामसेवक बी.ए.शिंदे यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य आरोग्यवर्धिनी उपकेंद्र शहाजीनगर यांच्यावतीने CHO डॉ.वैशाली खाडे यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना संदर्भात यावेळी सर्व महिलांना अभियानातील उपक्रम सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा, निरोगी जीवनशैली आणि पोषण आहार, आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या अभियानात होण्यासंदर्भात माहिती दिली. यानंतर त्यांनी माध्यमिक विद्यालय शेटफळ यावेळी येथे प्रबोधन पर लेक्चर व योग शिबिर घेतले.
यावेळी ग्रामसभा प्रशासकिय अधिकारी डॉ.निकम,CHO डॉ.वैशाली खाडे,MPW नरेश सावंतराव,शेटफळ हवेली येथील आजी-माजी सरपंच,सदस्य,पदाधिकारी,कोतवाल , पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका,आशा सेविका, युवक, ग्रामपंचायत कर्मचारी,महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.