
दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी :- श्री.विकास पुणेकर
इगतपुरी:- आज रोजी बुधवार १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला ह्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी श्री.जितेंद्र नाद्रें यांनी ग्रामस्थांना अभियाना संदर्भातील सविस्तर माहिती दिली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील नकाशावरील व नकाशाबाहेरील रस्त्यांबाबत प्रपत्र क्र.1 व 2 च्या माध्यमातुन माहिती सादर केली.ग्रामस्थांच्या चर्चेनंतर गावातील रस्त्यांची यादी तयार करण्यात आली.यावेळी ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत स्वच्छता, पाणीपुरवठा, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले. असून लोकसहभागातुन गावाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच या अभियानात सहभाग नोंदवून ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
तसेच ग्रामसंघाच्या महिला भगिनी यांच्या वतीने जागृती रॅली काढण्यात आली होती.
यावेळी कार्यक्रमाला माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, महसुल अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पत्रकार , महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांसह ग्रामस्थ महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.