
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
श्री श्री श्री १००८ केदारनाथ रावल, जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, केदारपीठ – ओखीमठ, जि. रुद्रप्रयाग (उत्तराखंड) यांच्या ५३ व्या अनुष्ठान प्रसंगी त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यात आले.
अगामी डिसेंबर मध्ये होऊ घतलेला विश्व शांती कार्यक्रम अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर रोजी पूर्व तयारी व आढावा बैठक पालकमंत्री मा ना अतुलजी सावे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सम्पन्न झाली.
जगद्गुरू यांच्या सान्निध्यातून लाभलेली अनोखी सकारात्मकता,आध्यात्मिक ऊर्जा आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा शांत अनुभव हा खरोखरच अविस्मरणीय क्षण ठरला असून.गुरूंच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वातून सेवा, श्रद्धा आणि समाजकल्याणाचे मौल्यवान संदेश मिळाले.या दिव्य भेटीने अध्यात्मिक मार्गावर नवी प्रेरणा आणि दृढ संकल्प प्राप्त झाला त्यावेळी मा. संजू भाऊ कोवडगे खासदार डॉ. अजित गोपछडे,मा आ ओमप्रकाश पोकर्णा, किशोर स्वामी,संतुक हंबर्डे, राजेश कुंतूरकर,किशोर देशमुख,बालाजी पांडागळे,लक्ष्मण ठकरवाड कॉन्ट्रॅक्टर माकणे ,माधव पाटील उचेकर,खुशाल पाटील उमरदरीकर, नागनाथ पाटील सावळीकर,सह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थिती होते.