
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी-प्रा विजय गेंड
अकलूज: पृथ्वीवरील प्राणीमात्राचे संरक्षण ओझोन थर करीत असल्यामुळे त्याचे संवर्धन करण्यासाठी वायु प्रदूषण व प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न केला पाहिजे. पृथ्वी संवर्धनात ओझोनचे कार्य स्पष्ट करताना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. बाळासाहेब साळुंखे सर यांनी ओझोन वायूचे महत्त्व, ओझोन थराच्या क्षयाची कारणे व त्यावरील उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली. शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाअंतर्गत आयोजित ‘जागतिक ओझोन दिन ‘ या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर हे होते.त्यांनी याप्रसंगी आपणा सर्वांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. पुढे त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून निसर्गाप्रती सजगता दाखवणे तसेच पर्यावरण संरक्षणाकरिता प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे हे सांगून अतिनील किरणांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती दिली.या कार्यक्रमा निमित्त वनस्पतीशास्त्र विभागाने पोस्टर प्रदर्शन, स्लोगन प्रदर्शन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विविध विभागाचे स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेचे परीक्षक म्हणुन प्रा. डॉ.संतोष गुजर , डॉ. भगवान साळुंखे ,प्रा.दादासाहेब कोकाटे यांनी काम पहिले. स्पर्धेमध्ये यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. सविता सातपुते यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुलिका नवघरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अनंत साठे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. अनंत साठे, प्रा. विक्रम कुंभार प्रा. सुजित वाघ प्रा. मधुलिका नवघरे, प्रा. दिपराज माने देशमुख कार्यालयीन प्रबंधक श्री. राजेंद्र बामणे कार्यालयीन अधीक्षक श्री. युवराज मालुसरे व शिक्षकेतर कर्मचारी श्री बाबासाहेब कदम यांनी परिश्रम घेतले.