
तुफान गोळीबारात २ जवान शहीद; परिसरात खळबळ…
हल्ला एका शस्त्रधारी गटाने वाहनांवर केला तुफान गोळीबारहल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आलीये, तर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.भारतातील मणिपूरच्या आसाम रायफल्सवर भीषण हल्ला झाला आहे. शस्त्रधारकांनी आसाम रायफल्समधील जवानांवर तुफान गोळीबार केला. या गोळीबारात ५ जवान जखमी झाले आहेत. तर दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याने खळबळ उडाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी ६ वाजता जवानांवर गोळीबार झाला. या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर घटनेत एकूण २ जवान शहीद झाले आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रधारकांच्या एका गटाने वाहनांवर गोळीबार केला. या वाहनातून आसाम रायफल्सचे जवान इंफाळ येथून बिष्णूपूर जिल्ह्यात जात होते. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले.
दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘जखमी जवानांना पोलीस आणि स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हल्लेखोरांचाही शोध सुरु करण्यात आला आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन वीरेन सिंह यांनीही या घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एन वीरेन सिंह यांनी म्हटलं की, ‘३३ असम रायफल्सच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याची बातमी ऐकून मला खूप धक्का बसलाय. दोन जवान शहीद झाले. तर काही जवान जखमी झालेत. मी शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी जवान लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. शहीद जवानांचं धैर्य आणि बलिदान हृदयात जपुयात. हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’.