
दैनिक चालु वार्ता दिवा-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा- दिवा एक जंक्शन चरित्र व चारित्र्य या पुस्तकांच्या लेखकांनी पुस्तकामध्ये आगरी – कोळी समाजाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला असुन, त्यामुळे आगरी कोळी समाजाच्या तिव्र भावना दुखावल्या आहेत, कोणालाही एकाद्या समाजाबद्दल आपमानित शब्द लिहिण्याचे व बोलण्याचे कोणताही अधिकार नसुन, पुस्तकांचे लेखक राम माळी व सुधीर राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावे व त्या पुस्तकातील लेख काढून टाकण्यास सांगावे. दिवा शहरात होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये. ह्या गोष्टीची दखल घेऊन आगरी-कोळी समाजाला योग्य तो न्याय देण्यात यावा अश्या अशयाचे निवेदन आज मुंब्रा पोलीस ठाणे यांना आगरी कोळी संघर्ष समिती (दिवा) शहराच्या वतीने करण्यात आले.