
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आमसभेत शासकीय कामकाजाचा आढावा घेताना सरकाही अधिकाऱ्यावर भलतेच संतापले. नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या.
यावर अधिकारी मोघम उत्तरे देत असल्याचे पाहून आमदार पवार संतापले. “आतापर्यंत गोट्या खेळत होतात का?” अशा शब्दात अधिकाऱ्यांना फटकारले. त्यांच्या या भूमिकेवर राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जसे काका तसाच पुतण्या म्हणत काका-पुतण्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देतना अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे.
हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे. जास्त अहंकार आणि अटीट्यूड दाखवू नकोस,” अशा शब्दांत पवारांनी अधिकाऱ्यांना थेट भरसभेत सरकारी अधिकाऱ्याला सुनावले. यापुढे अशा कामचुकार अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही, तर जनतेला थेट शेण थापायला सांगा अशी फटकारणी देखील आमदार पवारांनी केली.
दरम्यान, आज पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावरर असताना माध्यमांनी त्यांना व्हायरल होणाऱ्या रोहित पवारांच्या भू्मिकेवर काही प्रश्न उपस्थित केले. यावर पवार यांनी बोलताना, सुसंस्कृत महाराष्ट्रात कसे वागलं बोलेल पाहिजे हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिकवण दिली आहे. त्या मार्गाने गेलात तर जरा जास्त त्याचा वापर होईल. अशा शब्दात कानउघडणी करत पाठराखणदेखील केली.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
संविधानासह घटनेनं प्रत्येकाला अधिकार दिला आहे. कोण कसं वागाव कोणी काय बोलाव कस काम करुन घ्या…हा ज्याच्या त्याचा प्रश्न असतो. आम्ही आमचं काम करतो. सगळ्यांनी योग्य पद्धतीने सुसंस्कृत महाराष्ट्रात कसे वागलं बोललं पाहिजे याची शिकवण चव्हाण साहेबांनी दिली आहे. त्या मार्गाने गेलात तर जरा जास्त त्याचा वापर होतो. अस पवार म्हणाले.