
राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या विधानावर अखेर सदा सरवणकरांच स्पष्टीकरण !
मी स्वत: या जिम खान्याचा सदस्य आहे. मला अभिमान वाटतो की, त्याचं आज खूप सुंदर अशाप्रकारे उद्घाटन झालय. सर्वसामान्य तरुणांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा प्रकारची वास्तू उभी राहिलेली आहे.
आनंद वाटतो, अभिमान आहे. राज साहेबांचे मी ही आशीर्वाद घेतले. मी पदस्पर्श केला. त्यांनी सुद्धा पाठिवर थाप मारली. आमच खूप जुन नातं आहे राजसाहेबांशी. बाळासाहेब ज्यावेळी होते, त्यावेळी राजसाहेबांना भेटायचो. आज मी त्यांचा शेजारी आहे. निवडणुका एक वेगळा विषय आहे. नातं आमच जिव्हाळ्याच आहे. पक्ष म्हणून त्यावेळी आमची जी जबाबदारी होती ती पूर्ण केली. पण नात विसरता येत नाही. राजसाहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे” असं सदा सरवणकर म्हणाले. आज शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या वास्तूच उद्घाटन झालं. त्या प्रसंगी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. अमित ठाकरे दादरमधून मनसेचे उमेदवार होते. त्यामुळे सदा सरवणकर आणि राज ठाकरे यांच्या संबंधात कटुता निर्माण झालेली.
विद्यमान आमदारांना विकासकामांसाठी 2 कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे,असं सदा सरवणकर म्हणाले. त्यावरुन वाद उभा राहिला आहे. आज सदा सरवणकर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “शेजारच्या ठिकाणी कॅरम स्पर्धा झाली. त्या स्पर्धेच्या ठिकाणी वास्तू वाढवून पाहिजे होती. म्हणून ते आमदारांकडे गेले. त्यावेळी आमदाराने सांगितलं मला 2 कोटी मिळतात. माझ्याकडे निधी वैगेर नाही. त्या लोकांनी मला सांगितलं, त्यावर मी म्हटल आताचा आमदार दोन कोटी म्हणत असालं, पण मी ज्यावेळी आमदार होतो, त्यावेळी 25 ते 30 कोटी मिळत होते. आताही आमदार नसलो, तरी माझ्याकडे त्यापैकी 2023-24-25 या कालावधीत मंजूर झालेल्या 20 कोटीची काम आजही व्हायची आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते असले तर आमदारांना निधीची कमतरता पडत नाही हेच मला सांगायचं होतं” असं सदा सरवणकर म्हणाले.
‘त्यामुळे त्याला मी केलेली काम दिसणार नाहीत’
आमदार मतदाकरसंघात फिरला तर त्याला मी केलेली काम दिसतील. बिल्डरांची ऑफिस आणि त्यांच्या साईटवर दिसतो. मुलाला माथाडीची काम देतो. त्यामुळे त्याला मी केलेली काम दिसणार नाहीत. आजही 20 कोटीची काम शिल्लक आहेत.आमदार नसताना आजही मी ती काम करतोय. हा निधी 2022-23 या कालावधीत मिळालेला निधी होता. असंख्या काम बाकी आहेत. लोकसभा, विधानसभा आणि पावसामुळे कामं थांबली होती. एकच कॉन्ट्रॅक्टर होता. ती काम मी करतोय असं सदा सरवणकर म्हणाले.