
पाकिस्तानी चाहत्यांची बोलती बंद…
सुपर 4 सामन्यात पाकिस्तानच्या सलामी फलंदाज साहिबजादा फरहानने (Sahibjada Farhan) अर्धशतक ठोकल्यानंतर ‘गन फायर’ सेलिब्रेशन केलं होतं. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज हॅरिस राउफ वारंवार 6-0 असा इशारा करत दिसत होता.
राउफ फाइटर जेट खाली पडत असल्याचाही इशारा देत होता. सुरुवातीला सोशल मीडियावर या दोन्ही खेळाडूंना चाहत्यांकडून जोरदार उत्तर मिळालं. आता भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही वेगळ्या अंदाजात पाकिस्तानी चाहत्यांची बोलती बंद केली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात स्पष्ट दिसत आहे की, हा व्हिडिओ सामना संपल्यानंतरचा आहे. काही चाहत्यांनी अर्शदीप सिंगकडे इशारा केला, तर भारतीय गोलंदाजाने मजेशीर अंदाजात त्यांना प्रत्युत्तर दिलं. या स्पर्धेत अर्शदीप सिंगने फक्त ओमानविरुद्धच सामना खेळला होता, जिथे त्याने 1 विकेट घेतली आणि टी20 फॉरमॅटमध्ये आपल्या 100 विकेट पूर्ण केल्या. या स्पर्धेत पुढे टीम मॅनेजमेंट बुमराहला विश्रांती देऊन अर्शदीप सिंगला संधी देऊ शकते.