
राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली…
सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं पाकव्याप्त कश्मिरमधील दहशतवाद आणि दहशतवादी संपवून टाकले.आता वेळ जवळ आलीये. ती पीओकेवर ताबा घेण्याची. होय. उद्या किंवा परवा किंवा येणारी एक सकाळ ही पीओकेला भारतात घेऊन भारत एकसंध होण्याची वेळ आलीये. त्याला कारण ठरलंय. ते भारताच्या संरक्षण मंत्र्यांचं एक विधान. पाहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले.
ऐकलंत राजनाथ सिंह यांनी काय म्हटलंय. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या या एका विधानानं पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची झोप उडालीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून पीओकेमधील या सुंदर पर्वतीय प्रदेशात दहशतवाद्यांची फॅक्टरी उघडून जगाला अस्थिर करण्याचं त्यांचे स्वप्न आता भंगणारेय. खरंतर भारताच्या या भूभागावर पाकचं नियंत्रण आहे परंतू येथील पाच साडे पाच लाख लोकं मात्र दहशतवादानं भरडले आणि महागाईनं पिचलेत. रोजचं जीवन जगण्यासाठी त्यांना भारतापेक्षा दुप्पट दर देऊन जीवन जगावं लागतंय. पीओकेमध्ये रोज लागणाऱ्या वस्तूंच्या दरावर एक नजर टाकूया.
वस्तू भारत पीओके
कांदा 30-40 रुपये 50-60 रुपये
दूध 60-70 रुपये 120-140 रुपये
साखर 40-50 रुपये 70-80 रुपये
तेल 100-120 रुपये 180-200 रुपये
चिकन 200-300 रुपये 500-600 रुपये
हे दर पाहून आणि भयाण वातावरणातून मुक्त होत, स्वाभिमानानं स्वतंत्र्यात जगणं हे भागातील नागरिकांना देखिल परवडणारंच. त्यामुळे आता भारतानं जर आपली शक्ती आणि युक्ती वापरून जर पीओकेवर ताबा मिळवला तर नवल वाटालया नको म्हणूनच आता तयारी सुरु झाली ती गेल्या 75 वर्षांपासून जुलूमशाहीत भरडलेल्या प्रदेशाला मुक्त करण्याची. आणि पीओकेत तिरंगा फडकवण्याची.