
स्वामी चैतन्यानंदचे हादरवणारे WhatsApp मेसेज उघड; 16 वर्षात तब्बल 50 तरुणींवर अत्याचार…
दिल्लीत आश्रमाच्या प्रमुखपदी असणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती नावाच्या बाबाने महिलांसोबत छेडछाड आणि अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हा कथित बाबा दिल्लीत उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या वसंत कुज परिसरातील एका खासगी मॅनेजमेंट संस्थेचा संचालक आहे. त्याने संस्थेत शिकणाऱ्या मुलींना ‘माझ्या खोलीत ये… मी तुला परदेश दौऱ्यावर घेऊन जाईन, तुला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत’, असे मेसेज पाठवले होते.
श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमधील 50 महिलांच्या मोबाईल फोनवर सापडलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमधून गेल्या 16 वर्षांत डझनभर महिलांवर अत्याचार झाल्याचं उघड झालं आहे. ज्यामध्ये अश्लील मजकूर आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध यांचा समावेश आहे.
एका मेसेजमध्ये ‘स्वामी चैतन्यनंद’ने एका महिलेला त्याने संपत्तीचे आश्वासन देऊन आमिष दाखवलं होतं. दुसऱ्या मेसेजमध्ये त्याने कमी गुण देण्याची धमकी दिली होती. “… जर तू माझी आज्ञा पाळली नाहीस तर मी तुला नापास करेन,” असं तो म्हणाला होता.
आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात स्वामी चैतन्यानंदने मागील 16 वर्षांपासून महिलांना लक्ष्य केल्याचं उघड झालं आहे. स्वामी चैतन्यानंदचा ज्याचा ओडिशामध्ये पार्थसारथी येथे झाला आहे. 2009 आणि 2016 मध्ये यापूर्वी दाखल झालेल्या दोन छेडछाडीच्या गुन्ह्यांमधून सुटका झाल्याने त्याला हिंमत मिळाली होती.
भयानक म्हणजे दुसरा गुन्हा त्याच वसंत कुंज आश्रमातील एका तरुणीने दाखल केला होता. पण पोलीस किंवा आश्रम प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून आलं.
अशी होती मोडस ऑपरेंडी?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्वामी चैतन्यानंदचा’ व्हॉट्सअॅप फोन कॉल किंवा मेसेजद्वारे पीडित तरुणांना गाठायचा. बऱ्याच प्रकरणांमध्ये पहिल्या मेसेजमध्ये धमक्या नसायच्या. जर त्याच्या सुरुवातीच्या मेसेजेसमधून त्याला हवा तो प्रतिसाद मिळाला नाही, तर नंतर ब्लॅकमेल करायला सुरुवात करायचा.
पोलिसांनी सांगितले की, ज्या महिलांना त्याने लक्ष्य केले होते त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील होत्या. या महिला किंवा त्यांचे कुटुंबीय काही भाष्य करणार नाहीत याची कदाचित त्याला खात्री होती.
या सगळ्यात त्याला तीन महिला वॉर्डननी मदत केल्याची माहिती आहे. या सर्वांनी व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे अत्याचारित महिलांना धमकावलं असावे. वॉर्डनचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
कोण आहे स्वामी चैतन्यानंद सरस्वती?
जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा तो लंडनमध्ये होता. ऑगस्टच्या सुरुवातीला 16 महिलांनी दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती – आणि पोलिसांनी सांगितले की तो शेवटचा आग्रा येथे दिसला होता.
2009 आणि 2016 मधील याआधीचे दोन गुन्हे देखील तपासात आहेत. पहिले प्रकरण छेडछाड आणि फसवणुकीशी संबंधित आहे; या आरोपात त्याला थोडक्यात अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्याच्यावर आणखी दोन आरोप आहेत. एक आरोप आश्रमात सापडलेल्या आणि त्याने वापरलेल्या भगव्या रंगाच्या व्होल्वो सेडानवर संयुक्त राष्ट्रांच्या वाहनासाठी बनावट नंबर प्लेट वापरण्याशी संबंधित आहे. खरं तर, अनेक बनावट प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.
पाचवा गुन्हा फसवणुकीचा आहे. आश्रमानेच केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप उघड झाल्यानंतर आश्रम अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी बाबाला हद्दपार केलं आहे. (दिल्लीमध्ये) तो ज्या युनिटचे नेतृत्व करत होता ती दक्षिण भारतातील एका प्रमुख धार्मिक संस्था शृंगेरी येथील दक्षिणाम्नय श्री शारदा पीठाची शाखा आहे, ज्याने त्याच्या कृतींना “अयोग्य” म्हटले आहे.