
इतके दिवस फडणवीस-अजितदादांनी टाळलं नेमकं तेच केलं; म्हणाला…
हिंगोली : राज्यात यंदा मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातलं असून राज्यभरासहमराठवाड्यात सतत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
त्यातच हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात सुद्धा हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या परिस्थितीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, ही मागणी केली जात असताना आता सत्ताधारी आमदाराकडून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातचआता शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन निवेदन दिलं आहे. शेतकऱ्याला 30-40, 50-70% या पद्धतीने नाही तर 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशीमागणीही आमदार संतोष बांगर यांनी केलीआहे.
राज्यभरातपावसानेशेतकऱ्याचंअतोनातनुकसानकेलंआहे. परिणामी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. कारण गावांमध्ये शेतामध्ये जाऊन पाहिलं तर सोयाबीनला काहीही राहिलेलं नाही. सोयाबीन संपूर्ण सडून गेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे मंत्री नुकसान पाहणी करून आढावा घेण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळेशेतकऱ्यांनालवकरनुकसानभरपाईमिळेल. असाविश्वासही आमदार संतोष बांगर यांनी बोलतानाव्यक्त केलाआहे.
माढा तालुक्यातील 16 गावांना पुराचा तडाखा
शेतकऱ्यांना तातडीने 50 हजारांची मदत करा, अन्यथा विधानसभेत आवाज उठवणार, असा इशारा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सरकारला दिलाआहे. कोणतेही निकष न लावता पूरग्रस्त शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारने तातडीने 50 हजार रुपयांची मदत करावी, अशीमागणी अभिजीत पाटील यांनीकेलीआहे. माढा तालुक्यातील 16 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवातील कार्यक्रम रद्द करा आणि पूरग्रस्तांना मदत करा, असेआवाहन अभिजीत पाटीलयांनीकेलंआहे. शेतीबरोबर दुकान व्यवसायिकांना देखील मदत मिळावी, शाळांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत करावी. कोल्हापूर-सांगलीच्या धर्तीवर मदत करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची माहिती अभिजीत पाटील यांनीदिलीआहे. मात्र पूरग्रस्तांना मदत मिळाली नाहीतर सभागृहात आवाज उठवणार असाइशाराहीत्यांनीयावेळीदिलाआहे.