
अजित पवारांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण !
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (२६ सप्टेंबर) दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत.
तसेच काल त्यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसंदर्भात निवेदन दिलं आहे. महापुराने बेहाल झालेल्या मराठवाड्याला मदतीचा हात देणं गरजेचं असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधी नसला तरी उणे अर्थसंकल्पातून तरतुदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.