
सांगितले मोठे कारण…
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे.
आता मंत्री आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार, खासदार, नेते नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकप्रतिनिधींनी दौरे करू नये, असे आवाहन आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून केले आहे. त्यासाठी त्यांनी महत्त्वाचे कारण देखील सांगितले आहे.
‘पीडितांना भेटण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची अतोनात गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.’, असे शरद पवार म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप पाहता पंचनामे वेळेत करुन योग्य मदतकार्य सुरु व्हावे यासाठी आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त मनुष्यबळ व महसूल, कृषी, पाटबंधारे व इतर शासकीय अधिकारी यंत्रणा तातडीने पाचारण करणे आवश्यक आहे.’, असे देखील त्यांनी सांगितले.
मी राज्याचा प्रमुख असताना मुंबई बॉम्बस्फोट, लातूरचा भुकंप यासारखी अस्मानी-सुलतानी संकटाची परिस्थिती जवळून पाहिली आणि हाताळली आहे. अशा भयानक संकटात सापडलेली हजारो घरे व कुटूंबे पुन्हा उभी करण्यासाठी शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाच होतं आणि अशा प्रसंगी शासकीय कर्मचारी स्वतःला झोकून देऊन काम करतात हे महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेनं अनेकदा सिद्ध केलेलं आहे.’, असे सांगत फक्त तिच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. या प्रसंगी राज्यसरकार पिडीतांना दिलासा देण्याचे, त्यांना पुन्हा सक्षम करण्याचे काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दौऱ्यावर येऊ नये, पंतप्रधानांना विनंती
शरद पवारांनी मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होत असतो, याकडे लक्ष वेधत लातूर भूकंपावेळी पंचनामे व मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्याचा प्रमुख ह्या नात्याने लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले, एवढेच नव्हे तर इतर नेते व दस्तुरखुद्द प्रधानमंत्र्यांना देखील काही दिवस भूकंपग्रस्त भागात दौरा करू नयेत अशी विनंती केली होती, अशी आठवण देखील सांगितली.