
अबू आझमी यांचे मोठ वक्तव्य !
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या आशिया कप विजयाबद्दल मोठे विधान केले आहे.
भारताने पाकिस्तानचा पराभव करून ९व्यांदा आशिया कप जिंकला असला, तरी अबू आझमी यांनी यावर टीका केली आहे.
‘पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला नको’
अबू आझमी म्हणाले, “भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, कारण पाकिस्तान आमच्याविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन देतो. तरीही, आपल्या संघाने चांगली कामगिरी केली आणि जिंकला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
ते पुढे म्हणाले, “या आशिया कपमधून मिळालेला सर्व महसूल काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिला पाहिजे. जर विजय आमचाच होणार होता, तर त्यांच्यासोबत खेळण्याची गरजच काय होती? आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना पाकिस्तानशी कोणतेही मैत्रीपूर्ण संबंध नको आहेत.”
‘आम्ही पाकिस्तानला पैसे कमवण्याची संधी दिली’
आझमींनी पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या कथित मदतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही त्यांना पैसे कमवण्याची संधी दिली. जर हे पैसे दहशतवादावर खर्च केले गेले, तर ते योग्य नाही. पाकिस्तान आधीच दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी युद्ध करून त्यांना पूर्णपणे संपवले पाहिजे. आपण युद्धबंदी का लागू केली…
तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? – संजय राऊत
यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीसह भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होऊ नये अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून सुरुवातीपासून केली जात आहे. पहलगामवर हल्ला झाल्यामुळे आणि यामध्ये 26 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पाकिस्तानसोबत सामना होऊ नये अशी मागणी केली जात होती. मात्र भारत आणि पाकिस्तानचा कोणताही सामना रद्द झाला नाही. तसेच अंतिम सामना देखील दोन्ही संघामध्ये झाल्यामुळे जोरदार टीका विरोधकांनी केली. तसेच राज्यातील सर्व पीव्हीआर मधील भारत-पाक सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग शिवसेना ठाकरे गटाकडून रद्द करण्यात आले. यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत टीकास्त्र डागले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानबरोबर खेळायला विरोध आहे ही लोकभावना आहे. काल अनेक ठिकाणी मॅच दाखवण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही हाणून पडला. काल भारतीय संघ जिंकला असं कळलं. तुम्ही ट्रॉफी घ्यायला नकार दिला पण तुम्ही खेळतात. तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर खेळत आहात. देशाच्या पंतप्रधानांकडून ही प्रेरणा घेतली आहे. जय शाह आल्या पासून भारतीय क्रिकेट बोर्डात महाराष्ट्र दिसत नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भारतीय संघाच्या (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.